मुंबई प्रतिनिधी: कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळावा, या पवित्र उद्देशाने साकारलेल्या “निसर्ग छाया” केंद्राची आणि त्याच्या देदीप्यमान यशाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या अभिनव आणि कौतुकास्पद प्रकल्पाच्या चालिका सौ. अमृता देवगांवकर यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील अत्यंत विशेष अशा “जय हो” मालिकेत एक सविस्तर मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. दूरदर्शन प्रस्तुत तसेच राजा माने व मंदा माने कृत असलेल्या या विशेष भागामध्ये ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाचा संपूर्ण प्रवास आणि समाजोपयोगी कार्याचा वेध घेतला जाणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल अमृताताईंचे कौतुक केले असून, “ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा उपक्रम कसा आकाराला आला, हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी ही मुलाखत नक्की पहावी,” असे आवाहन केले आहे.
मुलाखतीचे थेट प्रक्षेपण आणि वेळ
मुलाखतकार : सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर आणि राजेंद्र माने
पहिले प्रसारण: गुरुवार, ४ जून २०२६ — रात्री ८.०० वाजता
पुनःप्रसारण: शुक्रवार, ५ जून २०२६ — दुपारी २.०० वाजता
वाहिनी: दूरदर्शन सह्याद्री (Doordarshan Sahyadri)
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अमृता देवगांवकर यांनी या प्रकल्पाचे असे उत्कृष्ट नियोजन केले की, आज हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलले आहेत. त्यांनी केवळ एक संस्था उभी केली नाही, तर सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे
‘निसर्ग छाया’ उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल २२,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात विरंगुळा आणि निखळ आनंद निर्माण केला. ‘डेस्टिनेशन कोवर्किंग’ संकल्पनेच्या माध्यमातून २००० हून अधिक तरुण व नवोदित उद्योजकांना हक्काची जागा आणि व्यवसाय वाढवण्याचे बळ दिले. ‘उन्नती’ अभियानाद्वारे १०० हून अधिक महिला उद्योजकांच्या पंखांना बळ देऊन त्यांना थेट जागतिक बाजारपेठ व व्यासपीठ मिळवून दिले. हा थक्क करणारा प्रवास आणि सामाजिक भान समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा आणि इतरांनाही आवर्जून कळवा, अशी विनंती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…