Categories: करमाळा

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

*
करमाळा, प्रतिनिधी :  अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक संलग्न करमाळा केंद्राच्या सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठीच्या  नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते व बिनविरोध पार पडली. समाजसंघटन, शैक्षणिक प्रगती, युवक सक्षमीकरण आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री. संतोष (काका) मुरलीधर कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
गेल्या कार्यकाळात संतोष कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाला संघटित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यावाटप, शैक्षणिक मार्गदर्शन, ब्राह्मण वधू-वर सूचक मंडळाचे कार्य, सामुदायिक मुंज सोहळे तसेच विविध समाजकल्याणकारी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
समाजातील सर्व स्तरांतील बांधवांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत समाजाला विकासाची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले.
याशिवाय ब्राह्मण समाजातील युवकांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे यासाठी मार्गदर्शन शिबिरे, शासकीय योजनांची माहिती, आर्थिक सहाय्य आणि कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. युवकांनी रोजगारनिर्मितीकडे आणि उद्योजकतेकडे वळावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
निवडीनंतर बोलताना संतोष (काका) कुलकर्णी म्हणाले, “समाजातील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन व कर्जसुविधा मिळवून देण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात प्रयत्न केले जातील. तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील जास्तीत जास्त बांधवांना मिळावा यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल.”
त्यांच्या नेतृत्वावर आणि समाजाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत समाजबांधवांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे आणि समाजहिताला दिलेल्या प्राधान्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नवीन कार्यकारिणीत श्री. रविंद्र यशवंत विव्दत यांची कार्याध्यक्ष, श्री. निलेश अरविंद गंधे यांची कार्यवाहक, श्री. नागेश शशीकांत विव्दत यांची सहकार्यवाहक, श्री. भारत पुरुषोत्तम घुगीकर यांची सचिव, श्री. राजेंद्र रामकृष्ण सूर्यपुजारी यांची उपाध्यक्ष तसेच श्री. सागर सुनिल कुलकर्णी यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच श्री. प्रसाद गंगाधर कुलकर्णी यांची देणगीदार सदस्य म्हणून, तर श्री. नितेश निशिकांत कुलकर्णी, सौ. हेमा हरिभाऊ विव्दत आणि सौ. मयुरी शैलेश गंधे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे करमाळा केंद्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाच्या उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

24 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago