डॉ. वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या गोदावरी 2013-41 या तुरीच्या वाणाने करमाळा तालुक्यात विक्रमी उत्पादन देत शेतकऱ्यांच्या यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. या वाणामुळे तुरीच्या पिकाचा प्रचार-प्रसार आता राज्याबाहेरही झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सन 2023 मध्ये कुंभारगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीला ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्यानंतर करमाळा तालुका राज्याच्या प्रकाशझोतात आला. त्यानंतर 2024 मध्ये या चळवळीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. फिसरे येथील कृषी योद्धा श्री. हनुमंत रोकडे यांनी एकरी तब्बल 21 क्विंटल उत्पादन घेऊन विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या यशोगाथेचे व्हिडिओ विविध यूट्यूब चॅनेलवर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष या वाणाकडे वेधले गेले.
याच पार्श्वभूमीवर 2026 च्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला तेलंगणा राज्यातील जहीराबाद येथील प्रगतशील शेतकरी – प्रभाकर रेड्डी, मुरलय्या व प्रशांत रुस्तुम यांनी श्री. हनुमंत रोकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर 3 जून रोजी त्यांनी करमाळा येथील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी, शाखा क्र. 2, बेंद फाटा येथे भेट देऊन गोदावरी 2013-41 या वाणाचे सुमारे 36 किलो बियाणे खरेदी केले.
या बियाण्याच्या माध्यमातून ते सुमारे 30 ते 35 एकर क्षेत्रावर तुरीची लागवड करणार असून, लागवडीतील अंतर, बीजप्रक्रिया, तसेच आंतरपीक व्यवस्थापन याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन घेतले.
एकूणच, गोदावरी 2013-41 या वाणाच्या यशस्वी प्रसारामध्ये करमाळा तालुका व राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अग्रस्थानी असून शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे व ‘फार्मर कप’सारख्या उपक्रमांमुळे हे यश शक्य झाले असल्याचे कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी स्पष्ट केले
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…