या सोहळ्यात समाजप्रबोधनकार तथा झी टीव्ही फेम ह.भ.प. विनोद रोकडे (महाराज) कोळगावकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर पुष्पहार अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात येणार असून, शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे विचारही व्यक्त करण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली क्षण मानला जातो. स्वराज्य स्थापनेचा, स्वाभिमानाचा आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेचा भाग म्हणून करमाळ्यातील शिवभक्तांनी यंदाही भव्य स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरायांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा जागर केला जाणार आहे. तसेच युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात व राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, हा संदेशही कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
करमाळा शहर व तालुक्यातील शिवप्रेमी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, छत्रपती चौक परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे. शिवरायांच्या जयघोषाने परिसर भारावून जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती तथा शिवस्मारक प्रतिष्ठाण, करमाळा शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…