Categories: Uncategorized

भारतीय जनता पार्टी आणि नंदन प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप सरचिटणीस तथा नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम 2026 श्री संत संताजीनगर करमाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास भाजपा पदाधिकारी , प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची गरज जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी ज्येष्ठ नेते संजय घोरपडे , तालुकाध्यक्ष काका सरडे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक युवराज चिवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,आजिनाथ सुरवसे, नितीन झिंझाडे, पत्रकार दिनेश मडके,सचिन पांढरे, हनुमंत मस्तूद,निखिल हटकर गुरुजी,निलेश माने,अक्षय जाधव, महेश क्षिरसागर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago