Categories: करमाळा

ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार. प्रा.झोळ सर यांच्या मागणीला यश*

करमाळा प्रतिनिधी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार. प्रा.झोळ सर यांच्या मागणीला यश आले आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गाला लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू कराव्यात. असे निवेदन दिनांक 25/08/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर यांनी दिले होते. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी सकारात्मकता दाखवून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रा. झोळ सर यांनी वारंवार भेटी घेऊन पाठपुरावा केला होता. आज इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जेवढ्या शैक्षणिक सवलती आहेत त्या सर्व शैक्षणिक सवलती आज पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू होणार असा शासन निर्णय पारित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रा.रामदास झोळ सर यांनीही हा शासन निर्णय काढल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.तसेच SEBC व OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये जात पडताळणी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासंबंधीचा GR लवकरात लवकर काढावा. अशी विनंती प्रा. झोळ सर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती. त्याचीही मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेऊन लगेच शासन निर्णय पारित केलेला आहे. त्या शासन निर्णयामुळे ही ज्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच खुल्या (EWS)वर्गातील जैन,मारवाडी,ब्राह्मण,मुस्लिम व खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या इतर सर्व जातींसाठी सदरील सर्व शैक्षणिक सवलती लागू होण्यासाठी प्रयत्न करणार असेही प्रा.रामदास झोळ सर यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना प्रा. झोळ सर म्हणाले महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात मराठा समाजाला सर्वात जास्त शैक्षणिक सवलती देणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा कायम उल्लेख होईल. माननीय मुख्यमंत्री साहेब व महायुती सरकारचे प्रा. रामदास झोळ सर यांनी खूप खूप आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago