ग्रामीण भागातील रुग्णांना हृदयविकाराच्या तपासण्या व उपचारांसाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर , बार्शी, अकलूज, बारामती किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह विविध हृदयरोग निदान व उपचार सुविधा करमाळ्यातच उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या कार्डियाक केअर युनिटमुळे हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार देणे शक्य होणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्वर्गीय डॉ. प्रदीप कुमार (आबा) जाधव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेली ही सुविधा ग्रामीण आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या सुविधेमुळे करमाळा तालुक्यात आधुनिक आरोग्यसेवेची नवी ओळख निर्माण होणार असून, हृदयरोग तज्ञविणुमंकड उपचार क्षेत्रात करमाळा आता अधिक सक्षम बनणार आहे.
असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…