करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात सन 2018 पासून दरवर्षी पर्यावरणपूरक श्री गणेशत्वसव साजरा केला जात आहे. यावर्षी देखील श्री गणेशत्सव पर्यावरणपूरक साजरा केला गेला. याकरीता करमाळा शहरात सर्व नागकरीकांना पर्यावरणपूरक शाडूच्या मातीने बनविलेले मुर्ती बसविण्याकरीता आग्रह धरला गेला. तसेच घरच्या घरी मातीपासून, कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशमुर्ती तयार करण्यास अनेक नागरिकांनी प्राधान्य दिले. सजावटीकरीता प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर न करता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याकरीता आवाहन केले गेले त्यानुसार अनेक घरामध्ये झाडांच्या सानिध्यात श्री गणरायांना विराजमान केले.
त्याचप्रमाणे श्री गणेशमुर्तीचे विर्सजन हे घरच्या घरीच करण्याचे आवाहान नगरपरिषदेने केले होते तसेच मुर्तीदान करण्याचे आवाहन देखील केले होते. त्याकरीता सर्व नगरपरिषद शाळांमध्ये श्री गणेश मुर्तींचे संकलन केंद्र उभारण्यात आले. या केंद्रात तब्बल 300 मुर्तींचे दान केले गेले. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे मुर्तीच्या खाण्याच्या सोडा पाण्यात टाकून त्यात पॅस्टर ऑफ परिसचे विघटन होवून उर्वरित पाणी खतयुक्त अमोनिअम सल्फेट द्रावण असते ते झाडांना खत म्हणून वापरले जावेतर उर्वरित मातीपासून कर्बानेटपासून आपण पुर्नवापर करुन सिमेंटच्या कुंडयाही बनवू शकतो.अशा प्रकारे देखील काही नागरिकांनी घरच्या घरी पर्यावरणपूरक पध्दत अवलंबली शाडूच्या किंवा मातीची श्री गणेशमुर्ती पाण्यात विरघळल्यानंतर उर्वरित माती आपल्या तुळशीच्या कुंडीत वापरण्यात आली.
कोणत्याही सार्वजनिक विहीरीत व नैसर्गिक पाणी साठ्याता विसर्जनास बंदी करण्यात आली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने करमाळा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अंतर्गत साजरा करण्यात आला. व पर्यावरणचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला. करमाळकरांनी स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत राज्यात 22 वा क्रमांक मिळवला आहे.आपण स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.त्याअंतर्गत नागरीकांनी आतिशय उत्साहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेतला व पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा केला व नगरपालीकेच्या केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व करमाळकरांचे आभार-. वीणा पवार मुख्याधिकारी करमाळा
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचे अविरत सेवा करणारा प्रमुख घटक…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…