Categories: करमाळा

शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, आमदार नारायण आबा पाटील यांचा महावितरणला इशारा सोमवार ८ जुन रोजी मोर्चाचे आयोजन

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज देण्याची व्यवस्था करा तसेच वीजे संदर्भात शेतकऱ्यांनी मागणी केलेले प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा सोमवार दिनांक ८ जुन २०२६ रोजी आपण स्वतः शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार नारायण आबा पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. वीजेचे प्रश्न प्रलंबित असल्याने याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले असुन या निवेदनात शेवटी प्रश्न मार्गी नाही लागले तर  सोमवारी दिनांक ८ जुन रोजी करमाळा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे नमुद केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की सध्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुकीच्या वीज पुरवठा धोरणांचा फटका बसत आहे. आपण करमाळा मतदार संघातील वीजेची मागणी व पुरवठा यांचे गणित जुळवण्यासाठी ३३/११ केव्हीए क्षमतेची नवीन सबस्टेशन तसेच ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर प्राप्त करुन दिले परंतु तरीही यावरील फिडर आणि लाईनची कामे दिरंगाईने केली जात आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असुन उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे आता आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांना या बाबीची गंभीरता समजली जावी व तातडीने शेती पंपाचा वीज पुरवठा पुर्ण दाबाने व अखंडीत पणे दिला जावा यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी जाहीर केले आहे.  आमदार कार्यालयाकडून सोमवार दिनांक ८ जुन रोजी दुपारी १२ वाजता करमाळा येथील तहसिल कार्यालयावर आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार असलेल्या मोर्चाची तयारी सुरू केली गेली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago