संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी रोजगार व व्यावसायिक संधींचे नवीन दालन खुले होईल. या मान्यतेमुळे दत्तकला शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला नवे बळ मिळाले असून परिसरातील विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी शिक्षणासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी संस्थेच्या सचिवा सौ. माया झोळ यांनी सांगितले की, दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला मान्यता मिळणे हा संपूर्ण दत्तकला परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांचे दूरदर्शी नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व हितचिंतक यांच्या अथक परिश्रमांमुळेच दत्तकलाला हे यश संपादन करता आले आहे. हे यश केवळ संस्थेचे नसून दत्तकला परिवारातील प्रत्येक सदस्याच्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फलित आहे. या यशासाठी मी संपूर्ण दत्तकला परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, यापुढेही सर्वाच्या सहकार्याने दत्तकला शिक्षण संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नवनवे मानदंड प्रस्थापित करत राहील.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…