सदर नियुक्ती खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब व शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख प्रतीक दादा शर्मा व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महादेवजी सरवदे तसेच शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री. अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे, लोककल्याणकारी योजना आणि विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत व घराघरांमध्ये अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी तुषार जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि सर्वच स्तरातून तुषार जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोशल मीडियाचे संघटन या चारही तालुक्यांत अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चौकट :-
शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर तुषार जाधव यांनी पक्षाचे आभार मानत म्हटले:
“पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. वंदनीय बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी, तसेच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येयधोरणे आणि लोककल्याणकारी योजना घराघरांपर्यंत पोहचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…