Categories: करमाळा

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा पोस्ट ऑफिसचे  पोस्ट मास्तर उदय बंडगर यांनी केली आहे.भारतीय डाक विभागाच्या करमाळा पोस्ट ऑफिसच्या वतीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी विशेष ‘आधार नोंदणी व अद्ययावत (Update) मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत हा मेळावा करमाळा पोस्ट ऑफिस येथे पार पडणार असून नागरिकांना विविध आधार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या मेळाव्यात नवीन आधार नोंदणी, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदल, नाव अथवा जन्मतारीख दुरुस्ती तसेच बायोमेट्रिक अपडेट (फोटो, फिंगरप्रिंट व आयरिस) अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
आधार कार्ड हे आजच्या डिजिटल युगातील अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने त्यातील माहिती अचूक आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. अनेक शासकीय योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रवेश तसेच इतर सेवांसाठी आधारची आवश्यकता भासत असल्याने नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर उदय बंडगर यांनी सांगितले की, आधारशी संबंधित विविध सेवांचा लाभ नागरिकांना सहज व जलद पद्धतीने मिळावा यासाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत करण्याची कामे करून घ्यावीत. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
भारतीय डाक विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना आधार संबंधित सेवा अधिक सुलभपणे मिळणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पोस्टमास्तर उदय बंडगर यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago