Categories: करमाळा

नेरले–गौंडरे परिसराला दिलासा; करमाळा–कुर्डूवाडी एसटी सेवा पुन्हा सुरू- औदुंबरराजे भोसले

करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून पुन्हा सुरू झाल्याने नेरले, गौंडरेसह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुंबई येथे निवेदन देऊन बससेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या आदेशानंतर ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
नेरले हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून गौंडरे गावाची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. गौंडरे येथे दोन विद्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणि सीना–कोळगाव प्रकल्प असल्याने या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे या गावांतील विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे.
या बसचे वेळापत्रक सकाळी ६ वाजता करमाळाहून सुटून हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेरले, वरकुटे व बारलोणी मार्गे सकाळी ८ वाजता कुर्डूवाडी येथे पोहोचण्याचे आहे. त्यानंतर त्याच मार्गाने परत येत सकाळी १० वाजता बस करमाळा येथे पोहोचणार आहे. दुपारी साडेतीन वाजता दुसरी फेरी सुरू राहणार आहे.
बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
बससेवा सुरू झाल्यानंतर नेरले, गौंडरे आणि परिसरातील नागरिकांनी बसचे उत्साहात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद गट नेत्या रश्मी बागल कोलते, युवा नेते दिग्विजय बागल, करमाळा आगार प्रमुख शिवाजी कानडे, नियंत्रक हनुमंत बिनवडे, एसटी डेपोचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधवांचे आभार मानण्यात आले.
“बससेवा कायम सुरू राहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात एसटीने प्रवास करावा,” असे आवाहन औदुंबरराजे भोसले यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago