चौधरी वलटे वस्ती वरती गतिरोधक टाकने गरजेचे आहे या ठिकाणी बोगदा असून कॉर्नर आहे जवळच जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे या ठिकाणी दोघा जणांचा काही दिवसांपूर्वीच अपघातामध्ये मृत्यू झाला आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो म्हणून ततकाळ ळ गतिरोधक टाकण्यात यावा . या ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतः टाकलेला गतिरोधक ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय परस्पर काढण्यात आला यामुळे ग्रामस्थ मध्ये संतापाची लाट आहे.
आठ दिवसाच्या आत या दोन्ही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावा गतिरोधक नाही टाकल्यास बहुजन संघर्ष सेना ग्रामस्थांना घेऊन राजाभाऊ काफम यांच्या नेतृत्वा खाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या करमाळा कार्यालया समोर करेल याची नोंद घ्यावी हे निवेदन बांधकाम अभियंता पाटील साहेब जगताप साहेब यांनी स्वीकारले निवेदन देण्यासाठी उपस्थित ग्रामस्थ दत्तात्रय दासा बदे, संतोष रामदास कोकरे, अशोक अनंता वलटे, कल्याण वलटे, हर्षद धर्मराज वलटे, दीपक बापू वलटे, हनुमंत पांडुरंग लठ्ठे, सोमनाथ श्रीहरी लठ्ठे, शहाजी दिगंबर वलटे, सतीश चतुर्भुज वलटे, भीमराव सदाशिव वलटे, ब्रह्मदेव महादेव वलटे, सचिन रामचंद्रबदे, मयूर भीमराव वलटे, किरण चांगदेव वलटे
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…