Categories: Uncategorized

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने करमाळा तालुक्याच्या रस्ते विकासाला मोठी गती; ८.५० कोटींचा निधी मंजूर लवकरच होणार कामाला सुरुवात– दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरेसाहेब यांनी करमाळा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती, डांबरीकरण इत्यादी कामांसाठी ग्रामविकास खात्याकडून गट ब अंतर्गत ८ कोटी ५० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला असुन या सर्व रस्त्यांच्या कामाची निविदा (टेंडर) प्रसिध्द् झाली असुन लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपा युवा नेते, मकाईचे माजी चेअरमन मा. दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली.याबाबत अधिक माहिती देतांना श्री. बागल म्हणाले की, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांनी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरेसाहेब यांना करमाळा करमाळा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती, डांबरीकरण, मजबुतीकरण इत्यादी कामांसाठी शिफारस पत्र दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेवुन रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी ५० लाख एवढा निधी मंजुर केला असुन या सर्व कामांच्या निविदा निघालेल्या असुन लवकरच या कामांना प्रारंभ होणार असुन त्यामुळे तालुक्यातील दळण-वळण व वहातूक व्यवस्था मजबुत होवुन नागरीकांच्या रस्त्यांच्या अडचणी दुर होण्यास मदत होईल.देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीससाहेब व पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरेसाहेब यांच्या सहकार्याने व गटनेत्या रश्मी दिदी बागल यांच्या प्रयत्नातुन भाजपा महायुती सरकारच्या माध्यामातून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांची घोडदौड अखंडीतपणे सुरु राहिल असा विश्वास मा. दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केला. या भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरेसाहेब यांचे विशेष आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago