“आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक ऐकण्यात सभासदांना कोणताही रस राहिलेला नाही. कारखाना पुन्हा सुरू होऊन त्याच्या भोंग्याचा आवाज ऐकण्याचीच सभासदांची आणि तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे,” असे मत हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीमंत-औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केले.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा ऊस क्षेत्राच्या जवळ असलेला महाराष्ट्रातील एकमेव कारखाना असल्याचे सांगत भोसले यांनी कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. उजनी जलाशयामुळे परिसरात पाण्याची कमतरता नसतानाही कारखान्याची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वर्गीय शंकरराव मोहिते-पाटील यांनी तत्कालीन नेते मंडळींच्या सहकार्याने या कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर काही काळ कारखाना संथ गतीने सुरू होता. स्वर्गीय दिगंबरराव बागलमामा आमदार झाल्यानंतर कारखान्याचा विस्तार, प्रशासकीय सुधारणा आणि नियोजनबद्ध कारभारामुळे कारखान्याने प्रगतीची नवी उंची गाठली. उत्कृष्ट इमारत, सक्षम व्यवस्थापन आणि सभासदांचा विश्वास यामुळे कारखान्याला महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकही प्राप्त झाला होता.
मात्र, आज हा कारखाना अस्तित्वाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. कारखाना बंद असल्याने अनेक कामगार कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून शेतकरी सभासदही दिशाहीन झाले आहेत. एकेकाळी प्रत्येक नागरिकाला आपला वाटणारा कारखाना आज बंद अवस्थेत असल्याने तालुक्याच्या प्रगतीला खीळ बसली आहे.
ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना विविध कारखान्यांच्या दारात जावे लागत असून, “कोणत्या गाडीत बसावे?” अशी अवस्था सभासदांची झाली असल्याचे भोसले यांनी सांगितले. सत्ताधारी मंडळाने निवडणुकीच्या वेळी कारखाना सुरू करण्याची आश्वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कारखाना सुरू करण्यासाठी कोणताही ठोस आराखडा नागरिकांसमोर मांडला गेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
करमाळा तालुक्यात जातेगाव-टेंभुर्णी रस्त्यासह अनेक रस्त्यांचे प्रश्न, तहसील आणि न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गांची दुरवस्था, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासनातील भ्रष्टाचार यांसारखे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा वेळी विकासाचा आराखडा मांडण्याऐवजी कारखान्याबाबत केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील काळात कारखान्याच्या विविध प्रश्नांवर आंदोलने झाली होती. आता कारखाना सुरू करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे मतही भोसले यांनी व्यक्त केले.
“आदिनाथ साखर कारखाना सुरू राहणे हे तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारखाना सुरू झाल्यासच शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…