Categories: करमाळा

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा संतोष काका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम स्तुत्य – डॉ. गणेश भाऊ करे-पाटील

करमाळा, प्रतिनिधी : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी आणि समाजासाठी अनुकरणीय असल्याचे मत यशकल्याणी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश भाऊ करे-पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश भाऊ करे-पाटील होते. यावेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर समर्थ न्युजचे संपादक  राहुल रामदासी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन व श्री कमलाभवानी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळाचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांचा समाजबांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात संशोधन करून अमेरिकेत तब्बल ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवणारे गुणवंत विद्यार्थी यश श्रीपाद आडकर यांचा सन्मान. डॉ. गणेश भाऊ करे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी यश आडकर यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गणेश  भाऊ करे-पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन आणि आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. समाजातील विविध संस्थांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे.”यश आडकर यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असुन त्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांनी स्वागत करून संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास योगेश पुंडे, राजेश पुंडे, देणगीदार संचालक प्रसाद कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, सचिव भारत घुगिकर, कार्याध्यक्ष रविंद्र विद्वत, उपाध्यक्ष राजेंद्र सुर्यपुजारी कार्यवाह निलेश गंधे, कार्यकारिणी सदस्य नागेश विद्वत, हेमाताई विद्वत, हरिभाऊ विद्वत, निलेश गंधे, शुभम कुलकर्णी, मकरंद दिवाण, श्रीपाद आडकर सर,संजयकुमार कुलकर्णी, प्रसाद पाठक, प्रमोद पाठक, मंगेश देशपांडे, शैलेश खळदकर, सुधीर ढोके, चैतन्य पाटील, अशोक कुलकर्णी, हरिभाऊ कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, राहुल जोशी, ओंकार कुलकर्णी, नितेश कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी, अतुल देशपांडे, हेमाताई विद्वत, शामल कुलकर्णी, कोमल कुलकर्णी आणि नेहा शास्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन संतोष काका कुलकर्णी यांनी केले तर आभार निलेश गंधे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago