करमाळ्यात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्यावतीने 2 जुलै रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन २९ वे वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाने शहर होणार भक्तिमय

करमाळा, प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा २७ व्या वर्षी करमाळा शहरात आगमन होत असून, त्यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २७ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सेवाकार्यात यंदाही मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे आगमन गुरुवार, दि. २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करमाळा शहरात होणार आहे. पालखी आगमनानंतर सायंकाळी ८ वाजता महाआरती होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी पारायण व प्रवचन, तर रात्री हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहामध्ये विविध प्रवचनकार, कीर्तनकार आणि भजन मंडळे सहभागी होऊन भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे कालनिर्णयात्मक कीर्तन होणार आहे. याशिवाय करमाळा तालुक्यासह परिसरातील अनेक हरिभक्त, कीर्तनकार आणि भजन मंडळे या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणार आहेत.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्याचे हे २९ वे वर्ष असून, या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण करमाळा शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

10 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

23 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago