Categories: करमाळा

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या डिप्लोमा व डिग्री अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमतेत वाढ

 

करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उ‌द्देशाने दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच डिग्री इंजिनिअरिंगच्या विविध शाखांच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. या वाढीस अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) यांची मान्यता प्राप्त झाली आहे.संस्थेमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उ‌द्योग क्षेत्राशी असलेले सामंजस्य करार (MoU) तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळावे यासाठी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या संकल्पनेवर विशेष भर दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधनवृत्ती, समस्या निराकरण कौशल्य आणि उ‌द्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक क्षमता विकसित होण्यास मदत होत आहे.याशिवाय संस्थेमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, प्रोजेक्ट कॉन्फरन्स, विविध कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम, उ‌द्योगाभिमुख उपक्रम, कॅम्पस प्लेसमेंट, स्टार्टअप व इनोव्हेशन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात सातत्याने केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला अभियांत्रिकी शाखांच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. प्रवेश क्षमतेतील वाढीमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून उ‌द्योगाभिमुख, कौशल्याधारित व संशोधनप्रधान शिक्षणाला अधिक चालना मिळणार आहे.याबाबत महावि‌द्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी शैक्षणिक वर्षात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, उ‌द्योग सहकार्य, इंटर्नशिप, स्टार्टअप व इनोव्हेशन, आंतरराष्ट्रीय परिषद, संशोधन प्रकल्प तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

1 hour ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

15 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

17 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

22 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago