Categories: Uncategorized

दत्तकला शिक्षण संस्थेची करमाळा ते केत्तूर नं- 1 बससेवा चालु वर्षापासून सुरु-प्रा. रामदास झोळ सर

 

करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) क्षेत्रात उत्तम करिअर घडवता यावे यासाठी केतूर नं. १ येथील नामांकित *‘दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’* मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी *डी. फार्मसी (D. Pharmacy)* अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उत्साहात सुरू झाली आहे. संस्थेचे दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली विशेष बस सुविधा यामुळे या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध संस्था*
दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ही संस्था दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीसाठी ओळखली जाते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग उपलब्ध आहे. तसेच प्रात्यक्षिक ज्ञानासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीने सज्ज अशा प्रयोगशाळा (Labs) आणि समृद्ध ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यावर संस्थेचा मुख्य भर आहे.
*करमाळा ते केतूर नं. १ विशेष कॉलेज बस सेवा!*
ग्रामीण भागातील, विशेषतः विद्यार्थिनींच्या दळणवळणाची अडचण ओळखून महाविद्यालयाने *करमाळा ते केतूर नं. १* या मार्गावर नियमित आणि स्वतंत्र कॉलेज बस सेवा सुरू केली आहे. ह्या निर्णयामुळे फार्मसी करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात न जाता आपल्या घरूनच कॉलेज ला ये जा करता येणार असल्याने करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.*अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क:* *मोबाईल क्रमांक:* *9527936895* *पत्ता:* दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, केतूर नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

29 mins ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

14 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

16 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

22 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago