Categories: Uncategorized

हिंदू-मुस्लिम भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक उपक्रम -सचिन काळे शाहू जयंती व मोहरमनिमित्त करमाळ्यात फळवाटप, सरबत वितरण मान्यवरांचा सत्कार

“
करमाळा प्रतिनिधी
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि मोहरम सणाचे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी करमाळा तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजयंती उत्सव समिती तसेच बहुजन विचार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. २६ जून रोजी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ वाजता रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून, दुपारी २ वाजता शहीद हजरत इमाम हसन व हुसैन यांच्या स्मरणार्थ अल्पोपहार व सरबत वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रांत कार्यरत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून तहसीलदार शिल्पा ठोकडे, डीवायएसपी अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, मुख्याधिकारी डॉ. सचिन तपसे, कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजात बंधुभाव, एकोपा आणि सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगून शहरातील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन काळे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

2 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

16 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

18 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

24 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago