Categories: Uncategorized

आषाढी एकादशीच्या तोंडावर शहरातील रस्त्यांची डागडुजी तातडीने करावी – जितेश कटारिया

 

करमाळा प्रतिनिधी आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात वारकरी व भाविकांची वर्दळ वाढणार असल्याने सर्व मुख्य रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी भाजप सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.सध्या पावसाचे दिवस असून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालकांना किंवा पादचाऱ्यांना त्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रमुख बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची अवस्था अधिक खराब असल्याचे त्यांनी सांगितले.आषाढी एकादशीसाठी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, दिंड्या आणि वारकऱ्यांचे आगमन होणार आहे.. अनेक ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही रस्त्यावरच केली जाते.शहरात सर्वात मोठी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी असते.त्यात 35 ते 40 हजार भाविकांची जेवणाची व्यवस्था रस्त्यावर केली जाते.. रस्त्याच्या दुर्दशामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगरपालिकेने तातडीने रस्त्यांची डागडुजी करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago