Categories: Uncategorized

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राजे रावरंभा शेतकरी कंपनीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर.

करमाळा प्रतिनिधी
वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (ता. २५) करण्यात आली.प्रतिष्ठानचे सचिव दीपक पाटील, अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, डॉ. बकुल पटेल, माजी आमदार मुश्ताक अंतुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे यांनी विधान भवन येथे या पुरस्कारांची घोषणा केली.
या पुरस्काराविषयी सविस्तर माहिती देताना दीपक पाटील म्हणाले की,१ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी व कृषी दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा सोहळा होईल या वेळी स्मरणिका प्रकाशनही होईल.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये ‘अग्रोवन’चे स्तंभलेखक सतीश खाडे यांना कृषी साहित्य पुरस्कार,’सकाळ’चे धुळे येथील पत्रकार भिलाजी जिरे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार, करमाळा येथील राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी निर्यात पुरस्कार, रत्नागिरी येथील राजेश पटवर्धन यांना फलोत्पादन पुरस्कार, वर्धा येथील वैभव उघडे यांना भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार, कागल (कोल्हापूर) येथील गौ अॅग्रीटेक कोल्हापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनीला दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार जाहीर करण्यात आला.या पुरस्कारासाठी ३५ हजार रुपये रोख , शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

चौकट –
राजे रावरंभा शेतकरी कंपनीच्या कामाची दखल…
२०२२ मध्ये स्थापन झालेल्या राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीने अल्पावधीमध्येच शेतकरी सभासदांचा विश्वास संपादन केलेला असून गोदावरी तूर २०१३४१ या परभणी विद्यापीठाच्या वाणाचा प्रचार प्रसार ,बीज प्रक्रिया ,बायोमासचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी लागणारे साहित्य आदी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील तूर उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.याबरोबरच बेंद फाटा येथे कंपनीने नव्याने १ एकर क्षेत्रावर ६० टन क्षमतेचा वजन काटा ,कोल्ड स्टोरेज, दहा ड्रम युनिट ,गांडूळ बेड युनिट , विषमुक्त धान्य विक्री केंद्र इत्यादी सुरू केले आहे.एकूणच कंपनीने अल्पावधीमध्येच केलेल्या कामाची दखल घेतली गेल्यामुळे तालुका व जिल्हा मध्ये पोहचलेली कंपनी आता राज्यभरामध्ये पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 hour ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago