Categories: करमाळा

रेश्मा विजयकुमार जाधव यांना मानाचा ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार–२०२६’ प्रदान

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी करत संगीत, योगसाधना, साहित्य आणि सामाजिक कार्य या चारही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या करमाळ्यातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व रेश्मा विजयकुमार जाधव यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शांतीदूत परिवार, डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन आणि इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजोपयोगी कार्य, संगीत साधना, योग शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व निःस्वार्थ योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, शांतीदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल जाधव (IPS) आणि डॉ. सुरेश राठोड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना रेश्मा जाधव म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या आजवरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रवासाची मोठी पावती आहे. या सन्मानामुळे समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही संगीत, योग आणि साहित्याच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.”
या पुरस्कारामुळे रेश्मा जाधव यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून त्यांच्या यशाबद्दल करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे करमाळ्याच्या नावात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago