Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गांना मंजुरी; पालकमंत्री जयकुमार गोरे व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांच्या सहकार्याने पाठपुराव्याला यश – गणेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे दिली , पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, पालकमंत्री मा. जयकुमार गोरे आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती मा. चेतनसिंह केदार यांच्या सहकार्यामुळे हा शैक्षणिक प्रश्न मार्गी लागला आहे,
करमाळा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गांना मंजुरी मिळावी, अशी मागणी सातत्याने आमच्याकडे केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागू नये, शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये आणि पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने पाठपुरावा केला होता, भविष्यातही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय घेतले जातील असेही गणेश चिवटे यांनी सांगितले,
यामध्ये करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघाचीवाडी, मानेवस्ती (कंदर), सुपनवरवस्ती (धायखिंडी), म्हसेवाडी (अर्जुननगर), गुटाळवस्ती (केम), पायघनवस्ती (शेलगाव क.), चौधरवाडी (झरे), गारगुटवस्ती (उमरड), चव्हाणवस्ती (मांजरगाव), हुलगेवाडी (कोर्टी), नाळेवस्ती (विहाळ), धगटवाडी (रायगाव) आणि इंगळेवस्ती (कंदर) या 13 शाळांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच पाचवीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, शिक्षणासाठी होणारी पायपीट, वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ग्रामीण शिक्षणाला चालना देणारा हा निर्णय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
या मंजुरीबद्दल जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी पालकमंत्री मा. जयकुमार गोरे, शिक्षण सभापती मा. चेतनसिंह केदार तसेच या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचे आभार मानले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago