Categories: करमाळा

आयटीआयला ‘मदनदासजी देवी’ यांचे नाव; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ऐतिहासिक नामांतर सोहळा संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा देण्याचा निर्धार

करमाळा : प्रतिनिधी
करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इतिहासात मंगळवारचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. शासनाच्या निर्णयानुसार करमाळ्याचे सुपुत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व. मदनदासजी देवी यांच्या नावाने संस्थेचे नामकरण करण्यात आले. “मदनदासजी देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर” या नावाने संस्थेच्या नामांतराचा ऐतिहासिक सोहळा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री मंगलप्रभात लोढा होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करत स्व. मदनदासजी देवी यांच्या राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य आणि समाजजीवनातील योगदानाचा गौरव केला. त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या नावाने करमाळा आयटीआयचे नामकरण होणे ही संपूर्ण करमाळ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात कौशल्याधारित शिक्षणाला काळाची गरज असल्याचे सांगत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. करमाळा आयटीआयमध्ये आधुनिक उद्योगांच्या गरजेनुसार नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम, रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनविणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती अत्यावश्यक असून त्यामध्ये आयटीआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख पाहुणे सुनील आंबेकर यांनी स्व. मदनदासजी देवी यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, सेवाभावी आणि संघटनात्मक कार्याची माहिती दिली. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशहिताची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी तांत्रिक शिक्षणाचे बदलत्या काळातील महत्त्व विशद केले. ग्रामीण भागातील युवकांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या रश्मीदिदी बागल-कोलते, माजी आमदार राम सातपुते, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, आयएमसी अध्यक्ष जितेंद्र राठी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे प्राचार्य तिमथ्य मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओंबासे, जाधव, गटनिदेशक मनोज सातव तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मनोज बिडकर यांनी केली. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सतीश सूर्यवंशी यांनी केले.
स्व. मदनदासजी देवी यांच्या नावाने करमाळा आयटीआयची नवी ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या राष्ट्रसेवा, संस्कार आणि कार्यातून प्रेरणा घेत गुणवत्तापूर्ण, कौशल्यसंपन्न व राष्ट्राभिमानी युवक घडविण्याचा संकल्प या ऐतिहासिक सोहळ्यात व्यक्त करण्यात आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago