Categories: करमाळा

पुणे येथील करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळाची त्रैमासिक संवाद बैठक उत्साहात संपन्न; करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा*

*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ, पुणे व पिंपरी चिंचवड यांची त्रैमासिक संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत करमाळा ते पुणे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सामाजिक उपक्रम तसेच करमाळा तालुक्यातील पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्यांवर व भविष्यातील उपक्रमांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी मुख्य संघटक मनोजकुमार मारकड यांनी प्रास्ताविक करत २०१३ पासूनच्या संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेतला. करमाळा तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची ही सर्वात जुनी, शिस्तबद्ध व सक्रिय संघटना असून, आज जवळपास १,४०० कुटुंबे या मंडळाशी जोडली गेल्याची माहिती त्यांनी दिली. करमाळा तालुक्यातील पुणे येथे स्थायिक झालेल्या नागरिकांना अडी-अडचणीच्या वेळी योग्य ती मदत मिळावी हाच या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. मोफत सहप्रवासी उपक्रमासह विविध सामाजिक कार्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळालेल्या सहकार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. संघटनेच्या माध्यमातून माजी आमदार संजय मामा शिंदे, नेत्या रश्मी बागल, आमदार नारायण पाटील, उद्योजक बाळासाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या बिगर राजकीय बैठका पार पडल्या असून, सर्वांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ सदस्य नंदकुमार तळेकर यांची विद्यार्थी समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पोलीस अधिकारी धर्मराज आवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत पुणे व पिंपरी चिंचवड येथून जेऊरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा तसेच अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना जेऊर स्थानकावर थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. याशिवाय पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली. यापूर्वी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.

संघटनेचे संघटक व उद्योजक संतोष दादा कांबळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सभासदांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी जागा उपलब्ध करून देणे व चहापानाची व्यवस्था केल्याबद्दल सक्रिय सभासद गोविंद जगदाळे यांचा विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले. बैठकीत उपस्थित सर्व सभासदांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. पुढील त्रैमासिक बैठकीची माहिती लवकरच मंडळाच्या अधिकृत ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शेवटी उपस्थित सर्व सभासदांचे करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ, पुणे व पिंपरी चिंचवडच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago