करमाळा शहरातील श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणारा २९ वा श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सायंकाळी ८ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील तसेच परिसरातील सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
करमाळ्यातील श्री स्वामी समर्थ मंदिर, फंड गल्ली येथे हा धार्मिक सोहळा पार पडणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी समर्थांच्या जयघोषात आणि नामस्मरणात भक्तांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला असून, महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
श्री स्वामी समर्थ सेवा (ट्रस्ट), फंड गल्ली, करमाळा यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व स्वामीभक्तांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून…
करमाळा : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव…
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…