Categories: करमाळा

शिक्षणाशी तडजोड नको; SIR कामासाठी पर्यायी शिक्षक द्या करमाळा शिक्षक समन्वय समितीचा तहसीलदारांना निवेदन; सहायक BLO नियुक्तीसह तातडीच्या उपाययोजनांची मागणी

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या Special Intensive Revision (SIR) अभियानामुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने तहसीलदारांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. SIR कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, दि. ३० जून ते दि. ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत SIR अभियान सुरू राहणार आहे. या काळात अनेक प्राथमिक शिक्षकांची Booth Level Officer (BLO) म्हणून नियुक्ती झाल्याने ते नियमित अध्यापनापासून दूर राहतील. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना SIR कामासाठी कार्यमुक्त करावे; मात्र त्यांच्या जागी पर्यायी शिक्षकांची त्वरित नियुक्ती करून अध्यापन सुरळीत ठेवावे, अशी समितीची मागणी आहे. तसेच SIR चे काम वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक BLO सोबत सहायक BLO नियुक्त करावा आणि त्यांनाही BLO प्रमाणेच योग्य मानधन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात शिक्षकांनी स्पष्ट केले की, निवडणूकविषयक कामे महत्त्वाची असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होता कामा नये. योग्य नियोजन, अतिरिक्त मनुष्यबळ आणि पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध झाल्यास शैक्षणिक कामकाज आणि SIR अभियान ही दोन्ही कामे सुरळीतपणे पार पडू शकतात.या निवेदनावर चंद्रहास चोरमले, तात्यासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, उमराव वीर, बाळू दुधे, अजित कणसे, संतोष माने, अर्जुन ढेरे, किरण सानप, अशोक दुधे, सुनील जाधव आदी शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी शिक्षक संजय चोपडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पर्यायी शिक्षक व सहायक BLO नियुक्तीची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा शिक्षक समन्वय समितीने व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago