करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील खंदकरोड येथील रहिवाशी पत्रकार जयंत कोष्टी यांच्या पत्नी प्राथमिक शिक्षिका सौ.दिपाली जयंत कोष्टी यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या घरी पर्यावरणपुरक मातीची गणपतीची मूर्ती तयार करून श्री गणेशा ची प्रतिष्ठापना करून समाजाला पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश आपल्या गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून दिला आहे.या पर्यावरणपुरक सजावटीच्या देखाव्यात स्वच्छतेला प्रत्येक सणा एवढेच महत्त्व देण्याबाबत संदेश ,वृक्षारोपण संदर्भातील संदेश…
शौचालयाच्या वापरासंदर्भातीलसंदेश…कचराकुंडी वापरासंदर्भातील संदेश..कापडी पिशवी..धुम्रपान विरोधी संदेश..स्री शक्तीचा संदेश..कायम स्वरूपी सेंद्रीय खत निर्मिती,निर्माल्यासाठी खास व्यवस्था
गणपती विसर्जनासाठी व्यवस्था. महिलासाठी किचन गार्डनिंगकडे महिलांनी आकर्षित व्हावे हा उद्देश समोर ठेऊन केलेली सजावट..️मन मोहून टाकणारी हिरवळीतील सजावट करण्यात आली होती. पाण्याचे प्रदुर्षण टाळण्यासाठी गणपतीचे विसर्जन घरीच बादलीमध्ये करण्यात आले.त्यांच्या या घरगुती गणेशोत्सव उपक्रमाचे करमाळ्याच्या मुख़्याधिकारी वीणाताई पवार यांनी कौतुक केले असून करमाळा नगरपरिषदेने आयोजित केलेल्या पर्यावरणपुरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धमध्ये त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षिका असुन आपले सण, उत्सव पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी असल्याचे मत प्राथमिक शिक्षिका दिपाली जयंत कोष्टी यांनी सांगितले.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…