ग्रामीण भागातील शेतीसाठी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीजपुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, रात्रीचा शेती वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी नेरलेचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या करमाळा कार्यालयातील अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतात वास्तव्यास असून सायंकाळी ६ ते १० ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची महत्त्वाची वेळ असते. मात्र, याच वेळेत वीज बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास खोळंबत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.
वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांना जनावरांची देखभाल, शेतीची कामे आणि इतर दैनंदिन कामे अंधारात करावी लागत आहेत. त्यामुळे सर्प व इतर वन्य प्राण्यांचा धोका वाढत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री १० नंतर वीज सुरू होत असली तरी त्याचा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ होत नसल्याचे राजेभोसले यांनी नमूद केले.
रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी महावितरणकडे ठराव व निवेदने सादर करून सामूहिक पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन महावितरणने हा निर्णय तातडीने बदलावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…