Categories: Uncategorized

आषाढी वारीसाठी करमाळा नगरपालिका सज्ज वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी १० जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन – नगराध्यक्षा सौ .मोहिनी सावंत

करमाळा प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी करमाळा नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक करमाळा नगरपरिषद कार्यालयात पार पडणार आहे.
आषाढी वारीच्या काळात करमाळा शहरातून अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. विशेषतः श्री संत निवृत्ती महाराज यांच्या दिंडीत मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी होत असल्याने शहरात वारकऱ्यांची मोठी वर्दळ असते. काही दिंड्या शहरात मुक्कामी राहतात, तर काही दिंड्या अल्प विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होतात.
या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय सुविधा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत म्हणाल्या, “करमाळा शहरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची योग्य ती व्यवस्था करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत असून सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.”
बैठकीला सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील समाज मंदिरे, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक सभागृहे वारकऱ्यांच्या निवासासाठी सज्ज ठेवण्याबाबत निर्देश दिले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करून तेथे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय प्रत्येक प्रभागातील समस्या, वारकऱ्यांच्या गरजा आणि आवश्यक उपाययोजना याबाबत नगरसेवकांकडून सूचना घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारामुळे यंदा आषाढी वारीदरम्यान करमाळा शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रशासनाचे हे नियोजन वारकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार असून, ‘अतिथी देवो भव’ या भावनेतून करमाळा शहर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

4 hours ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

11 hours ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

1 day ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

1 day ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

3 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

4 days ago