१२ जानेवारी २०२३ रोजी जन्मलेल्या ध्रुवचा हा अद्भुत पराक्रम २६ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला. त्यावेळी त्याचे वय अवघे २ वर्षे ६ महिने १४ दिवस इतके होते. एवढ्या लहान वयात त्याने आत्मविश्वासाने आणि स्पष्ट उच्चारात संपूर्ण हनुमान चालीसा सादर करून उपस्थितांना थक्क केले.
ध्रुव हा रोहन अरविंद पवार आणि ऐश्वर्या रोहन पवार यांचा सुपुत्र आहे. घरातील धार्मिक वातावरण, संस्कार आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे त्याला लहानपणापासूनच हनुमान चालीसाची गोडी लागली. पालकांच्या प्रेरणेने आणि नियमित श्रवण-साधनेतून त्याने संपूर्ण हनुमान चालीसा पाठ केली आहे.
ध्रुवच्या या विलक्षण कामगिरीची दखल घेत ‘Influencer Book of World Records’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याच्या नावाची अधिकृत नोंद केली आहे. “Tiny Voice, Timeless Devotion – Complete Hanuman Chalisa Recited at Just 2.5 Years” या विशेष शीर्षकाखाली त्याचा जागतिक विक्रम मान्य करण्यात आला आहे.
ध्रुवच्या या अद्वितीय आणि उल्लेखनीय कामगिरीचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, पद्मविभूषण सुधा मूर्ती, राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल तसेच अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ध्रुवचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवाय नगरसेवक अतुलदादा तरवडे यांनी ध्रुवचा रोख ५,००१ रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान केला. या अद्वितीय कामगिरीचे कौतुक करत त्याला भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याने केलेला हा पराक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा, स्मरणशक्ती आणि सकारात्मक विचारांची जोपासना कशी करता येते, याचे ध्रुव पवार हे एक सुंदर उदाहरण ठरले असून बारामतीच्या या चिमुकल्याचा सर्व स्तरांतून गौरव होत आहे.
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…
करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…
; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…