Categories: Uncategorized

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; जलसंपदा मंत्र्यांकडून सर्वेक्षणाचे आदेश -गणेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात आज मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेची पुढील प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत माहिती देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले की, रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मंत्री महोदयांनी सर्वेक्षणाचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे आता ही योजना मार्गी लागण्याबाबत मोठी आशा निर्माण झाली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील मंजुरीची प्रक्रिया गतीने पार पडेल आणि अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल, तसेच या योजनेमुळे करमाळा तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना या बैठकीत सकारात्मक दिशा मिळाली असून, जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या सर्वेक्षणाच्या आदेशांमुळे ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच मार्गी लागेल असे गणेश चिवटे यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

41 mins ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

47 mins ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

2 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

3 days ago

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

3 days ago