या सोहळ्या दरम्यान करमाळा वकील संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व विधीज्ञांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना सन्मानित केले. यामध्ये करमाळा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. योगेश शिंपी, उपाध्यक्ष ॲड. राहुल सावंत, सचिव ॲड. सागर तळेकर तसेच ॲड. जगदीश चव्हाण, ॲड. मनोजकुमार कांबळे, ॲड. अंकिता वेदपाठक आणि ॲड. भाग्यश्री वाशिंबेकर यांनी आपल्या हस्ते हा मानाचा सत्कार केला.
या भव्य लीगल कॉन्फरन्ससाठी न्यायव्यवस्थेतील अनेक दिग्गज आणि नामांकित व्यक्तींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई साहेब उपस्थित होते, तर सन्माननीय पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. एन. जे. जमादार साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. मिलिंद जाधव साहेब आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा ‘मॅट’ मुंबईचे व्हाईस चेअरमन मा. श्री. विनय जोशी साहेब यांनी व्यासपीठ भूषवले होते.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. मनोज शर्मा साहेब तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य मा. श्री. ॲड. मिलिंद थोबडे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गौरवपूर्ण सोहळ्याला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील असंख्य सन्माननीय वकील आणि विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा वकील संघटनेने केलेल्या या आदरतिथ्या बद्दल आणि सत्कार सोहळ्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील कायदे क्षेत्रातून मोठे कौतुक व गौरव होत आहे.
करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…
; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…
करमाळा, दि. ११ (प्रतिनिधी) : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याच्या समृद्ध सृष्टीची हमी देते, तर…
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…