Categories: Uncategorized

मतदानाचा हक्क वाचवायचा असेल तर २९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग करा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना आवाहन

करमाळा  प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मॅपिंग अभियानाला गती देण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृतीचे आवाहन केले.
बैठकीत बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी स्पष्ट केले की, एसआयआर मॅपिंग ही प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने आपली माहिती अद्ययावत करून मतदानाचा घटनादत्त हक्क सुरक्षित ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, एसआयआर मॅपिंग व नोंदणीची अंतिम मुदत २९ जुलैपर्यंत असून नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तहसीलदार ठोकडे म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाने आपली संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करून गावागावांत जनजागृती करावी आणि एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. बीएलओ-२ यांच्या माध्यमातून नोंदणीचे काम अधिक गतिमान करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच, या कामात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष तथा मकाईचे संचालक सचिन बापू पिसाळ, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी दीदी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर, मकाईचे संचालक सतीश बापू नीळ, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, अशोक नरसाळे, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, पत्रकार सुनील भोसले, प्रफुल्ल दामोदरे, संजय चौगुले, प्रशांत भोसले, सिद्धार्थ वाघमारे, रितेश कटारिया, सचिन चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येक पात्र मतदाराने २९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष, पत्रकार आणि नागरिकांनी समन्वयाने काम करून एसआयआर मॅपिंग अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

5 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

7 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago