Categories: Uncategorized

विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे – दिग्विजय बागल करमाळा तालुक्यातील २४ जणांना निवडपत्रांचे वितरण; समाजसेवेची संधी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन

 

करमाळा, प्रतिनिधी :
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. करमाळा येथे आयोजित विशेष कार्यकारी अधिकारी निवडपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करमाळा तालुक्यातील २४ जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदिदी बागल आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या या सदस्यांना करमाळा येथील कार्यक्रमात भाजपा नेते दिग्विजय बागल आणि विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना भाजप युवा नेते दिग्विजय बागल म्हणाले की, विशेष कार्यकारी अधिकारी हे पद केवळ मानाचे नसून समाजाप्रती जबाबदारीचे आहे. शासनाच्या विविध योजना आणि प्रशासनातील कामकाज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या पदावरील व्यक्तींनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि गरजा प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे ही विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी आहे.कार्यक्रमात बोलताना विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी सांगितले की, विशेष कार्यकारी अधिकारी या पदामुळे निवड झालेल्या व्यक्तींना समाजातील विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि गरजू घटकांसाठी काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. कोणत्याही वेळेचे किंवा परिस्थितीचे बंधन न मानता गरजूंना मदतीचा हात देणे आणि समाजहिताची कामे करणे हीच या पदाची खरी ओळख ठरेल.या कार्यक्रमास आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, श्री मकाईचे संचालक सतीश बापू निळ, रेवन्नाथ निकत, आशिष गायकवाड, रामभाऊ हाके, नितीन तकीक, शिवाजी कदम यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले, तर आभार रोकडे यांनी मानले.

*करमाळा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले सदस्य

अतुल बदर, शिल्पा पाटील (साडे), राजकुमार कोरे (पाथर्डी), अक्षय शेंडगे (गोयेगाव), अनिल पवार (हिवरवाडी), विजयसिंह मोहोळ (केम), नितीन निमगिरे (जेऊरवाडी), रेश्मा इंगोले (कोंढेज), बलभीम कांबळे (पोफळज), शिवाजी पिसाळ (झरे), लक्ष्मण खोमणे (गुलमोहरवाडी), दत्तात्रय सरडे (करंजे), सोनाली क्षीरसागर (केडगाव), भाग्यश्री बर्डे (रावगाव), संतोषकुमार जाधव (कोर्टी), मनोहरभाऊ लांडगे (कोंढार-चिंचोली), गजेंद्र पोळ (शेटफळ), अक्षय घाडगे (तरडगाव), नितीन तकीक (वांगी), हनुमंत वीर (पिंपळवाडी), तानाजी पवळ (शेलगाव), सविता कांबळे (करमाळा), बिबीशन नागणे (केम) आणि शुभम वेदपाठक (साडे) यांचा समावेश आहे.या निवडीमुळे तालुक्यातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना समाजसेवेच्या माध्यमातून प्रशासनाशी समन्वय साधण्याची आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा–आदमापूर एस.टी. सेवा सुरू भक्तांची मोठी सोय डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचा सत्कार; मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या पुढाकाराचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा आगारातून करमाळा ते आदमापूर (बाळूमामांचे स्थान) नवीन एस.टी. बससेवा सुरू झाल्याने बाळूमामा…

5 hours ago

ॲड. विशाल घोलप यांची करमाळा पंचायत समितीच्या विशाखा समितीवर विधीतज्ञ सदस्य म्हणून निवड

करमाळा : प्रतिनिधी पंचायत समिती, करमाळा अंतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध व…

6 hours ago

यशकल्याणीमध्ये विज्ञान, स्त्रीशक्ती आणि समाजऋणाचा प्रेरणोत्सव* *डॉ. प्रचिती पुंडे यांच्या सन्मानार्थ दरवर्षी ५० हजारांची संशोधन पारितोषिके; ३६ बालवैज्ञानिकांसह १४ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

करमाळा प्रतिनिधी : विज्ञानाला जिज्ञासेची, स्त्रीशक्तीला सन्मानाची आणि समाजसेवेला कृतज्ञतेची जोड देत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी…

10 hours ago

करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी : - भारतीय जनता पार्टी करमाळा शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते…

3 days ago

बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पाच महिन्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर- राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे पाच महिन्यापासून मंजूर झाली नव्हती तेव्हा…

3 days ago