Categories: Uncategorized

बँक ऑफ इंडिया वीट शाखेच्या वतीने मयत ग्राहकाच्या वारसास विमा दाव्याची रक्कम प्रदान अवघ्या ४३६ रुपयांच्या विमा हप्त्याने कुटुंबाला मिळाला दोन लाखांचा आधार

करमाळा, प्रतिनिधी :
कुटुंबातील कर्ती व्यक्ती अचानक निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा वेळी मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदतीचीही मोठी गरज असते. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमुळे वीट येथील एका कुटुंबाला अशाच कठीण काळात मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया, वीट शाखेच्या वतीने मयत ग्राहकाच्या वारसास दोन लाख रुपयांच्या विमा दाव्याची रक्कम प्रदान करण्यात आली आहे.बँक ऑफ इंडिया, वीट शाखेचे ग्राहक अरुण महादेव जाधव यांनी हयात असताना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अवघ्या ४३६ रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण घेतले होते. त्यांच्या निधनानंतर या योजनेचा लाभ त्यांच्या वारसदार पुत्र रमेश अरुण जाधव यांना मिळाला असून, दोन लाख रुपयांची विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जाधव कुटुंबासाठी ही मदत मोठा आधार ठरली आहे. अल्प प्रीमियम भरून मिळणारे मोठे विमा संरक्षण सर्वसामान्य नागरिकांसाठी किती उपयुक्त आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी बँक ऑफ इंडिया, वीट शाखेचे शाखाप्रमुख संजय काळे यांनी केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देताना सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना वार्षिक ४३६ रुपये प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटातील नागरिकांना केवळ २० रुपये वार्षिक प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येते.या दोन्ही योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शाखाप्रमुख संजय काळे यांनी केले. शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांमुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना संकटाच्या काळात मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी बँकेचे अधिकारी शैलेश शेलार, विशाल थोरात, मोईन काझी (रोखपाल), कर्मचारी विजया काळे, विद्या भांडवलकर, दीपक वाघ तसेच व्यवसाय सहाय्यक सचिन कानगुडे उपस्थित होते. विमा दावा मंजूर करण्यासाठी आणि लाभार्थी कुटुंबाला वेळेत मदत मिळवून देण्यासाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.केंद्र शासनाच्या अल्प प्रीमियमच्या विमा योजनांमुळे संकटाच्या काळात सामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत असून, या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाने घ्यावा, असा संदेश या प्रसंगी देण्यात आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा–आदमापूर एस.टी. सेवा सुरू भक्तांची मोठी सोय डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचा सत्कार; मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या पुढाकाराचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा आगारातून करमाळा ते आदमापूर (बाळूमामांचे स्थान) नवीन एस.टी. बससेवा सुरू झाल्याने बाळूमामा…

5 hours ago

ॲड. विशाल घोलप यांची करमाळा पंचायत समितीच्या विशाखा समितीवर विधीतज्ञ सदस्य म्हणून निवड

करमाळा : प्रतिनिधी पंचायत समिती, करमाळा अंतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध व…

6 hours ago

यशकल्याणीमध्ये विज्ञान, स्त्रीशक्ती आणि समाजऋणाचा प्रेरणोत्सव* *डॉ. प्रचिती पुंडे यांच्या सन्मानार्थ दरवर्षी ५० हजारांची संशोधन पारितोषिके; ३६ बालवैज्ञानिकांसह १४ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

करमाळा प्रतिनिधी : विज्ञानाला जिज्ञासेची, स्त्रीशक्तीला सन्मानाची आणि समाजसेवेला कृतज्ञतेची जोड देत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी…

10 hours ago

करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी : - भारतीय जनता पार्टी करमाळा शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते…

3 days ago

बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पाच महिन्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर- राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे पाच महिन्यापासून मंजूर झाली नव्हती तेव्हा…

3 days ago