Categories: Uncategorized

अजितदादा पवार जयंतीनिमित्त करमाळ्यात वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम भरतभाऊ आवताडे यांच्या पुढाकारातून मोफत सेवा केंद्र सुरू माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन

करमाळा, प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) करमाळा तालुकाध्यक्ष भरतभाऊ आवताडे यांच्या पुढाकारातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सेवा केंद्र सुरू करण्यात आले. करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते या सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या सेवा केंद्रात वारकऱ्यांना मोफत नाश्ता, चहापाणी, शुद्ध पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे भरतभाऊ आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रवक्ते व पंचायत समिती सदस्य ॲड. अजित विघ्ने, जेष्ठ पत्रकार विवेकराव येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुजीत तात्या बागल, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, डॉ. विकास वीर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, माजी नगरसेवक व उद्योजक प्रवीण जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, निभोंरेचे सरपंच रविंद्र वळेकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, तुषार जाधव,शहाजी झिंजाडे, कृष्णा डोंगरे, मानसिंग खंडागळे, प्रसाद जगताप, उद्योजक आकाश आवताडे, सुनील काटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा नलिनी लुंगारे गणेश माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सेवाभावी उपक्रमांमुळे वारीतील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आषाढी वारीदरम्यान हजारो वारकरी करमाळा मार्गे पंढरपूरकडे जात असतात. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले हे सेवा केंद्र वारकऱ्यांच्या प्रवासात महत्त्वाची मदत ठरणार असून, अधिकाधिक वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा–आदमापूर एस.टी. सेवा सुरू भक्तांची मोठी सोय डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचा सत्कार; मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या पुढाकाराचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा आगारातून करमाळा ते आदमापूर (बाळूमामांचे स्थान) नवीन एस.टी. बससेवा सुरू झाल्याने बाळूमामा…

5 hours ago

ॲड. विशाल घोलप यांची करमाळा पंचायत समितीच्या विशाखा समितीवर विधीतज्ञ सदस्य म्हणून निवड

करमाळा : प्रतिनिधी पंचायत समिती, करमाळा अंतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध व…

6 hours ago

यशकल्याणीमध्ये विज्ञान, स्त्रीशक्ती आणि समाजऋणाचा प्रेरणोत्सव* *डॉ. प्रचिती पुंडे यांच्या सन्मानार्थ दरवर्षी ५० हजारांची संशोधन पारितोषिके; ३६ बालवैज्ञानिकांसह १४ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

करमाळा प्रतिनिधी : विज्ञानाला जिज्ञासेची, स्त्रीशक्तीला सन्मानाची आणि समाजसेवेला कृतज्ञतेची जोड देत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी…

10 hours ago

करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी : - भारतीय जनता पार्टी करमाळा शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते…

3 days ago

बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पाच महिन्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर- राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे पाच महिन्यापासून मंजूर झाली नव्हती तेव्हा…

3 days ago