करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यांमध्ये आज एकूण 134 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल 44 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये जामखेड कर्जत तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.करमाळा तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये करमाळा शहरातील कृष्णाजी नगर 3, शाहुनगर 6,कमलाईनगर 2 , गणेशनगर –7 , सिंचननगर 1,स्टेट बँक- 2 , उपजिल्हा रुग्णालय 1, पर्णकुटी 2, सिध्दार्थनगर 3, सावंत गल्ली 6 असे एकूण 34 कोरोनाबाधीत आहेत. तर ग्रामीण भागातील गुळसडी 3,तरटगाव 1,केम 1,पांडे1 , जेऊर 1 ,जवळा जामखेड 1, कुळधरण कर्जत 1 सरपडोह 1 आज तब्बल 25 जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत552 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या 325 जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 902 वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…