Categories: Uncategorized

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामासाठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम भिलारवाडी येथील प्रगतशिल बागायतदार लक्ष्मण अंबोधरे, कारखान्याच्या मार्गदर्शिका रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल, कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांचे शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.तत्पूर्वी करमाळा तालुक्याच्च्या हरितक्रांतीचे प्रणेते, श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक लोकनेते स्व. दिगंबर रावजी बागल मामा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री उत्तम पांढरे, रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे, संतोष पाटील, रेवन्नाथ निकत, दिनकर सरडे, सतिश नीळ, युवराज रोकडे, सचिन पिसाळ, नवनाथ बागल, गणेश झोळ, बापू चोरमले, हंसराज पाटील, विलास काटे, अनिल शिंदे, महेश तळेकर, राजेंद्र मोहोळकर, विष्णू माने कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासदर व कारखान्याचे हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.गळीत हंगाम २०२६-२७ सुरू करण्याच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे युध्दपातळीवर सुरू करण्यात येत असुन ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम सुरू करण्याच्या सुचना संचालक मंडळाने संबंधीतास दिलेल्या आहेत. मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे तातडीने पूर्ण करून सक्षम ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कामावर घेवून यावर्षिचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून या गळीत हंगामात ४.०० लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने यावेळी व्यक्त केला.आपल्या कारखान्याचे यावर्षी गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या गकाई साखर कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी यावेळी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 day ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 day ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

2 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

2 days ago

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास

करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…

5 days ago