१२ जुलै रोजी श्रीक्षेत्र भऊर येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरातून दिंडीला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पहिला मुक्काम खेरी निमगाव (ता. श्रीरामपूर) येथे झाला. त्यानंतर देवळाली, धामोरी (ता. राहुरी), वडगावगुप्ता रोड, शिराढोण (जि. अहिल्यानगर), थेरगाव, पवार वस्ती-आनंदवाडी, डाकूनिमगाव (ता. कर्जत) येथे दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी फुलवृष्टी, आरती, चहापाणी, नाश्ता, महाप्रसाद, निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देत वारकरी सेवेची गौरवशाली परंपरा जपली.
१९ जुलै रोजी करमाळा येथे दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, युवक मंडळे, व्यापारी, सेवाभावी संघटना आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर दिंडीचा प्रवास २० जुलै रोजी मौजे पांगरे (ता. माढा), २१ जुलै रोजी तांबवे-टेंभुर्णी (ता. माढा) येथे मुक्काम करत २२ जुलै रोजी बार्शी पाटी, भोसे (ता. पंढरपूर) येथे अंतिम मुक्कामास पोहोचणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहे.
दिंडीतील प्रत्येक दिवस हा भक्तीचा उत्सव ठरत आहे. पहाटे काकडा भजन, हरिपाठ, विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग, भजन, कीर्तन, प्रवचन आणि सामूहिक महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वारकरी भक्तिमय वातावरण अनुभवत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीप्रमाणे समता, बंधुभाव, स्वच्छता आणि निस्वार्थ सेवेचा संदेश या दिंडीतून समाजापर्यंत पोहोचविला जात आहे.करमाळा मुक्कामादरम्यान अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा साप्ताहिक ‘पवनपुत्र’चे संपादक दिनेश मडके यांनी ह.भ.प. संजयजी महाराज जगताप यांचे स्वागत केले. यावेळी महाराजांनी दिनेश मडके यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. सामाजिक, धार्मिक आणि जनजागृतीपर पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.हजारो वारकऱ्यांच्या सहभागामुळे रोकडेश्वर हनुमान मंदिर, श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा केवळ धार्मिक प्रवास न राहता समाजप्रबोधन, मानवसेवा, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी महोत्सव ठरत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ह.भ.प. संजयजी महाराज जगताप यांचे विशेष कीर्तन, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने या दिंडीची भक्तिमय सांगता होणार असून, वारकरी संप्रदायाच्या वैभवशाली परंपरेचा हा सोहळा भाविकांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…