Categories: Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान शिबिर करमाळा शहर भाजप मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम -भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे

करमाळा  प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर भाजप मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आणि “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, शिबिराची व्यापक तयारी करण्यात आली आहे.
रक्तदान हे मानवतेची सेवा करणारे सर्वोच्च दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण, थॅलेसेमिया, कर्करोग तसेच इतर गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. या सामाजिक गरजेची जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय करमाळा शहर भाजप मंडळाने घेतला आहे.
हे रक्तदान शिबिर भाजपा शहर कार्यालय, गायकवाड चौक, करमाळा येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत पार पडणार आहे. शिबिरात रक्तसंकलनासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. युवक, महिला, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाला जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. गणेशभाऊ चिवटे यांचे मार्गदर्शन लाभत असून, करमाळा शहर भाजप मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम करमाळ्यात आदर्श ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. वाढदिवस साजरा करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करणे. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून या सेवायज्ञात सहभागी व्हावे.”
रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती मानवतेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल सरचिटणीस नितीन झिंजाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

28 mins ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

1 hour ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

7 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

23 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago