करमाळा प्रतिनिधी-माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्लीच्या फार्म हाऊसवर नेते माननीय अजितदादा पवार येण्याचे नियोजित झाले होते. मुंबईवरून दौड शुगर- नगोर्ली (माजी आमदार संजयमामाकडे राखीव)- परंडा- भुम- लातुर… असा काही त्यांचा दौरा होता. मी आदरणीय नेते संजयमामांना विनंती केली होती, मला एकदा अजितदादांना भेटायचं आहे. आमचा एक चांडगाव ते पोमलवाडी पुलाचा विषय आहे..फाइल तयार आहे.. फक्त एकदा व्यवस्थित चर्चा झाली की ते काम मार्गी लागेल. मामांनी आवर्जुन त्या दिवशी फोन केला..” तुम्ही नगोर्ली ला लवकर या.. दादा आपल्याकडे थांबणार आहेत थोडा वेळ.. जेवण आणि थोडा वेळ आराम करून मग पुढे जातील. मला मामांनी आवर्जुन आठवणीने सांगितले होते. मला अजितदादांना प्रत्यक्षात भेटण्याची ही संधी खूप महत्वाची होती. मी खुपच आनंदी होतो. अगदी उत्साहात मी नगोर्लीला पोहोचलो. तिथे आदरणीय दादांच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली होती. कधी एकदा मी दादांना भेटतोय आणि बोलतोय याची ओढ लागली होती.. सायरन वाजवत एक दोन गाड्या पुढे आल्या.. मागे दहा बारा गाड्या ताफ्यात दिसत होत्या.दादांची दमदारपणे फार्म हाऊसला एण्ट्री झाली.मुसळे साहेबांसह सगळा स्टाफ उतरला.. सर्वांचे यथोचितपणे स्वागत करण्यात आले.नेहमी प्रमाणेच आदरणीय संजयमामांशी हस्तांदोलन व विचारपूस करून आधी जेवण करून घेऊया का.. परत मला थोडा वेळ आराम करून पुढच्या नियोजित दौऱ्याला जायचे आहे..असे सांगत सांगतच सोलापुर जिल्ह्यातल्या व परिसरातील विविध विकासकामांविषयी संजयमामांशी चर्चा केली. मामांना ते नेहमीच संजय नावानेच संबोधित होते.अजितदादांचे आणि संजयमामांचे गुरु शिष्याचे दृढ नाते आणि एकमेकांवर नितांत प्रेमही होते. मामा आदरणीय नेते अजितदादांबरोबर कितीतरी हक्काने आणि आदरपूर्वक बोलत होते हे तिथे पहायला मिळाले. जेवण वैगेरे झाल्यानंतर मला मामांनी आवर्जुन दादांच्या जवळ बसवले.. ओळख करून दिली..मी बारामतीत विद्या प्रतिष्ठान लॉ कॉलेजचाच आपलाच विद्यार्थी आहे.आणि बराचवेळा भेटल्याचेही सांगितले. माझे माळेगाव येथिल मित्र रविराज तावरे ऊर्फ चिकु पाटील यासह किरण गुजर यांची कन्या ॲड.प्रिया गुजर व अनेकजण माझे सहकारी असलेबाबत दिलखुलास चर्चा झाली… मामांनी माझ्याकडील पोमलवाडी ते चांडगाव पुलाचे फाईलचा रेफरन्स देत सर्व कागदपत्रे, नकाशे दादांसमोर मांडले.. आम्हाला वाटलं होतं की कुगाव- शिरसोडीचा पुल झालाय मग आणखी हा प्रस्ताव कशाला असे काही दादा म्हणतील पण.. असे काहीच घडले नाही. आदरणीय दादांनी लागलीच पुण्याचे सार्व. बांधकामचे चिफ इंजि.अतुल चव्हाण साहेबांना फोन लावला.. मंत्री दत्तामामा भरणे यांचेसह सर्वांना सुचित केले आपल्याला उजनीवरील हा चांडगाव ते पोमलवाडी पुल करायचा आहे आणि दोन फाइल्स स्वतःचे गाडीत ठेवायला पीएंना सांगितले. आमचे नेते मान.संजयमांमानी दादांची प्रत्यक्ष घडवून आणलेली भेट माझ्यासाठी कायमच अविस्मरणीय ठरली आहे. आराम करणेपूर्वी मी व तिथे उपस्थित असणाऱ्या सरपंच तानाजी( बापू) झोळ व सर्व कार्यकर्त्यांनी दादांबरोबर फोटोही काढले.. दादांना अल्पवेळ आराम करून पुढे कार्यक्रमाला जायचे होते.अजितदादांचे कामाचे नियोजन, वेळेची शिस्त आणि तो कामाचा आवाका, धावपळ पाहुन थक्क झालो होतो… एक महिन्यांनी आदरणीय अजितदादांचा मामांना फोन आला.. तुम्ही चांडगाव-पोमलवाडी पुलाचे दिलेले काम मार्गी लावत आहे. सर्व सुचना दिलेल्या आहेत.. मामांनी मला कॉन्फरन्सिंग द्वारे पुन्हा दादांशी बोलणे करून दिले. त्यानंतर इंदापुरच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः दादांनी चांडगाव- पोमलवाडी पुल करणार असलेबाबत सांगितले. कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनीही आपले स्पेशल अजेंड्यावर हा विषय घेत काम मार्गस्थ केले. सन-२०२३ मधेच पुरवणी बजेटला काम मंजुर होणार होते परंतु निधी अभावी ते रेंगाळत राहीले मात्र सन-२०२६ च्या बजेटला या कामाला ३४० कोटींची तरतुद करण्यात आली. हे सर्व श्रेय आदरणीय अजितदादांना आणि त्यांचे शिलेदार असणाऱ्या कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आहे… आज मी दादांच्या राष्ट्रवादीचा करमाळा तालुक्याचा प्रवक्ता म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती म्हणून काम करत आहे. आदरणीय दादांनी आणि मामांनी माझ्या सारख्या सर्वसामान्याच्या पोराला दिलेली ही संधी नक्कीच अभिमानास्पद आहे. आदरणीय दादा.. आपल्या आदर्श विचाराचे पारदर्शक राजकारण आणि समाजकारण पुढे नेहण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन!.. दादा आज तुम्ही नसल्यामुळे तुमचे हजारो,लाखो कार्यकर्ते, जनसामान्य जनता पोरकी झालीआहे. परंतु दादा तुमचे विचार कायमच प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत.. आज आपली जयंती साजरी करताना डोळ्यात आपोआप अश्रु आल्याशिवाय रहात नाहीत!.. दादा आपल्या पहिल्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आहे!- आपला कार्यकर्ता- ॲड. अजित सर्जेराव विघ्ने( उपसभापती पं. स. करमाळा/ प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस( अप) करमाळा