Categories: Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान शिबिर; ५५६ रक्तपिशव्यांच्या संकल्पालाही ओलांडत विक्रमी रक्तसंकलन

 

करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त “सेवा संकल्प” उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडळाच्या वतीने गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद देत ५५६ रक्तपिशव्यांच्या संकल्पालाही मागे टाकत विक्रमी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक विक्रमजी देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा व समाजसेवेचा संकल्प करण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना विक्रम देशमुख म्हणाले की “गणेश चिवटे यांचे कार्य कौतुकास्पद असून ते अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करत आहेत. पक्षाचे विविध उपक्रम त्यांनी सातत्याने यशस्वी केले आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या जनसंपर्काचा, समाजसेवेचा आणि कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे.”
यावेळी गणेश चिवटे यांनी सांगितले की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. आज पावसाचे वातावरण असूनही करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. आमचे ५५६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प होता, मात्र नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा संकल्प पूर्ण होऊन अपेक्षेपेक्षाही अधिक रक्तसंकलन झाले. हे यश प्रत्येक रक्तदाता, प्रत्येक कार्यकर्ता आणि समाजहिताची जाणीव ठेवणाऱ्या नागरिकांचे आहे असे चिवटे यांनी सांगितले,
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, अमोल पवार , अशोक ढेरे, पत्रकार दिनेश मडके, राजश्री खाडे ,संगीता नष्टे , हनुमंत रणदिवे , सोमनाथ घाडगे, हर्षद गाडे ,अजित शिंदे ,आण्णा पडवळे , दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके , बंडू शिंदे , भैय्यासाहेब गोसावी, दादासाहेब येडे , जयंत काळे पाटील, तुषार जाधव, ईश्वर मोरे ,दत्ता एकाड, कुणाल दुरंदे, दादा गाडे ,गोकुळ अनारसे ,दादासाहेब सरडे ,हर्षल शिंगाडे, तात्यासाहेब शिंदे, संदीप काळे ,सागर सरडे, रंजीत पवार ,नानासाहेब अनारसे ,जयसिंग भोगे, जयसिंग घाडगे सुनील नेटके, संजय ढेरे ,दीपक गायकवाड ,अशोक मोरे ,संजय दुर्गुळे, आण्णा साळुंखे , लक्ष्मण शेंडगे, ऋषिकेश फंड,गिरीश वाशिंबेकर , विश्वनाथ ढेरे ,समाधान कांबळे, प्रकाश ननवरे, सुनील जाधव , रणजीत वीर, आबा वीर, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

4 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

5 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

10 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago