महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण मंडळाच्या वतीने शेलगाव (वांगी) येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असतानाही रक्तदात्यांचा उत्साह अबाधित राहिला आणि तब्बल १६९ जणांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे करमाळा तालुक्यातील युवा नेते तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय भैया बागल यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, समाजासाठी प्रत्येकाने नियमित रक्तदान करण्याची गरज व्यक्त केली.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र जनसंकल्प सेवा यज्ञ’ अभियानांतर्गत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमास भाजप करमाळा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सचिन पिसाळ, मकाई संचालक महेश तळेकर, युवराज रोकडे, गणेश तळेकर, पंचायत समिती सदस्य नितीन तकिक, मार्केट कमिटी संचालक कुलदीप पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम बंडगर, किसान मोर्चा अध्यक्ष रेवणनाथ फरतडे, लक्ष्मणजी केकान, संदीपान चौधरी, संतोष देशमुख, महावीर तळेकर, रविकिरण माळवे, दिलीप केकान, दत्ता पोटे, किरण साळुंखे, दत्तात्रय सातव, उदयसिंह केकान, रामदास राऊत, दादासाहेब काटे, नागनाथ केकान, तुकाराम पिसाळ, संतोष कांबळे, महादेव जाधव, विजय रोकडे, गणेश पोटे, गणपत कापसे, सुधीर साळुंखे, सोमनाथ पोटे, शंकर जाधव, चंद्रशेखर जोगळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरासाठी युवक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तरीही रक्तदात्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत रक्तदानासाठी हजेरी लावली. या शिबिरात १६९ युनिट रक्त संकलित झाले असून अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सेवाभावी उपक्रम समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा आदर्श ठरला असून, पावसालाही न जुमानता १६९ जणांनी केलेले रक्तदान हा मानवतेचा खरा उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस…
करमाळा, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष…
करमाळा प्रतिनिधी-माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्लीच्या फार्म हाऊसवर नेते माननीय अजितदादा पवार येण्याचे नियोजित…
करमाळा, प्रतिनिधी — भीमा कोरेगाव येथील जयस्तंभाच्या अस्तित्वाची लढाई, त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया आणि समाजाची…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा यज्ञ–महा रक्तदान संकल्प’ या…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर भाजप मंडळाच्या वतीने मंगळवार,…