Categories: Uncategorized

संगीत व योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बाळासाहेब नरारे यांना ‘कला शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित

 

करमाळा प्रतिनिधी: श्री श्री राजाहुआ सत्र यांच्या वतीने गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय दहाव्या आंतरराष्ट्रीय संगम महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात संगीत व योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. बाळासाहेब नरारे यांना त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत ‘कला शिरोमणी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. बाळासाहेब नरारे यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून संगीत क्षेत्रात अविरतपणे कार्य केले असून, संगीत शिक्षण व प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच योग क्षेत्रातही त्यांनी विनामूल्य योगसेवा देत समाजामध्ये आरोग्य व योगाबद्दल जनजागृती करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय व निःस्वार्थ योगदानाची दखल घेत त्यांची ‘कला शिरोमणी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.हा मानाचा पुरस्कार गुवाहाटी मध्य मतदारसंघाचे आमदार श्री. विजय गुप्ता यांच्या हस्ते श्री. बाळासाहेब नरारे यांना प्रदान करण्यात आला.या महोत्सवात भव्य सांस्कृतिक दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे नेतृत्व प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगलेल्या या महोत्सवाची सांगता ही प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या सुमधुर भैरवी गायनाने करण्यात आली. त्यांच्या भैरवी गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.या पुरस्कार सोहळ्यास भाजप नेते प्रभात हजारिका, प्रेसिडेंट सनातन बाप, व्हाईस प्रेसिडेंट विश्वज्योती डे, ॲडव्हायझर पंकज देवरा, प्राचार्य मिलिंद फंड, आदर्श व्यापारी संतोष शियाळ, नवनाथ थोरात, महोत्सवाचे सर्वेसर्वा हलीराम बोरा, मंजूमनी बोरा यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर, संगीत रसिक, देश विदेशातील कलाकार आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. बाळासाहेब नरारे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संगीत, कला व योग क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

3 hours ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

1 day ago

करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांसाठी 2 कोटीं 50 लाख निधी मंजूर पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल यांची माहिती

  करमाळा प्रतिनिधी | बळीराजाला शेतात जाणे सोयीचे व्हावे तसेच शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व…

2 days ago