करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच बहुप्रतिक्षित कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तात्काळ सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.या भेटीत करमाळा तालुक्यातील शेती, सिंचन आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांनां वीजपुरवठ्याच्या अपुऱ्या वेळेमुळे शेतीला पाणी देताना मोठ्या अडचणींना सामोरे जात असल्याचे शिंदे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या परिसरात सलग ८ तास वीजपुरवठा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने सुरू करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशीही मागणी करण्यात आली. ही योजना मार्गी लागल्यास तालुक्यातील २४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनात वाढ होईल तसेच दुष्काळी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत दि.२५ जुलैपासून वीज पुरवठा नियमित केला जाईल तसे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याची व कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी ही तात्काळ सुरुवात होईल असे आश्वासन ना.विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती भेटीनंतर आ. शिंदे यांनी दिली.
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…