Categories: Uncategorized

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीचे शिष्यवृत्तीत घवघवीत यश; स्पेलिंग बी स्पर्धेत स्वराली इरकर तालुक्यात प्रथम

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरवाडी येथील इयत्ता चौथीतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. तसेच विनोबा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नन्हे सितारे स्पेलिंग बी’ स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी स्वराली राजेंद्र इरकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष धनाजी पवार, समीक्षा दत्तात्रय मेरगळ, श्रुती गोरख पवार, समर्थ महेश इरकर, जानवी राजेंद्र इरकर, प्रज्वल बापू इरकर आणि वैष्णवी निलेश इरकर या सात विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले असून शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन तसेच वर्गशिक्षक श्री. नाना वारे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाना वारे सर यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, विनोबा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नन्हे सितारे स्पेलिंग बी’ या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीची विद्यार्थिनी स्वराली राजेंद्र इरकर हिने उत्कृष्ट कामगिरी करीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तिला वर्गशिक्षिका दीपाली गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वरालीच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक कामगिरीत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा व स्पेलिंग बी स्पर्धेत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अधिक प्रेरणा मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे महत्त्वपूर्ण योगदान देणारे वर्गशिक्षक नाना वारे सर यांचाही सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या याच विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतही सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीतील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. ‘खेळाबरोबर शिक्षण आणि शिक्षणाबरोबर खेळ’ हा आदर्श या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून समाजासमोर ठेवला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे हे यश फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago