Categories: Uncategorized

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी सलग ८ तास विजेच्या मागणीसाठी चिकलठाण येथे आमरण उपोषण; शंभूराजे जगताप यांच्या पाठिंब्याने व प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथील श्री टोप्या बाबा मंदिर प्रांगणात शेतीपंपासाठी दररोज सलग ८ तास वीज पुरवठा मिळावा, या मुख्य मागणीसाठी स्थानिक धरणग्रस्त शेतकरी व युवकांनी २६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला बळ देण्यासाठी करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी २७ जुलै रोजी प्रत्यक्ष उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलकांसोबत उपोषणास बसून पूर्ण पाठिंबा दर्शवला.
​विजेच्या तीव्र कपातीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि प्रशासनाच्या अनास्थेविरोधात चिकलठाण परिसरातील शेतकरी आक्रमक झाले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत करमाळा तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी उपोषणस्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तात्काळ संबंधित महावितरण व वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
​उपोषणकर्त्यांचा सहभाग व २ दिवसांचा अल्टीमेटम
​प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. प्रशासनाच्या आवाहनाला आणि विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, येत्या २ दिवसांत शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर यापेक्षा मोठ्या संख्येने एकत्रित येऊन पुन्हा तीव्र उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
​या आमरण उपोषणात अविनाश सरडे, विनोद सय्यद, योगेश सरडे, संदीप सरडे, दादासाहेब सरडे, शंकर बोंद्रे, सचिन गाडे, रंजीत गव्हाणे, धुळाभाऊ कोकरे, सुभाष गुळवे, दिनकर सरडे, महादेव कामठे, चंद्रकांत सरडे, चंद्रकांत सुरवसे, सुनील सरडे, बापूराव सरडे, तानाजी सरडे, अतुल सरडे, नितीन सरडे, अमोल सरडे, रावसाहेब नेमाने, अमोल शेळके, पप्पू गव्हाणे, वीरेंद्र प्रताप गलांडे, बिंटू झोळ, राजेंद्र बारकुंड, राजाभाऊ कवितके, दादासाहेब लबडे, हनुमंत सरडे, कैलास बोंद्रे आणि ज्योतीराम पवार यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; २४ तासांत निर्णयाची खात्री
​या गंभीर समस्येबाबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांना सविस्तर मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार पुढील २४ तासांच्या आत या मागणीवर योग्य ती कारवाई करून वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, अशी पक्की खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
​”करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांवर नेहमीच अन्याय का?” – शंभूराजे जगताप
​उपोषणस्थळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप यांनी प्रशासनाच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “कै. नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या योगदानातून व दूरदृष्टीने आकारास आलेले उजनी धरण हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची ‘जीवनदायिनी’ मानले जाते. या जीवनदायिनीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी देऊन मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, दुर्दैवाने याच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर कायमस्वरूपी अन्याय केला जात आहे — मग तो शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न असो किंवा राखीव पाण्याचा!”
​ते पुढे म्हणाले, “आज उजनी धरण ५०% हून अधिक भरलेले असतानाही केवळ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कपात केली जात आहे. यामुळे सामान्य शेतकरी आणि जनतेमध्ये सत्ताधारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. भविष्यात आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्षपात, जातीवाद किंवा गट-तट न पाहता सर्व शेतकरी वर्गाने संघटित होऊन एका छताखाली लढा दिला पाहिजे.”

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago